E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
डिंभे धरणात २६ टक्के पाणीसाठा
Samruddhi Dhayagude
11 Apr 2025
मंचर, (प्रतिनिधी) : हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणात गुरुवार केवळ २६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून गत वर्षी ३३.०६ टक्के होता. आंबेगाव, जुन्नर, शिरूर या पुणे जिल्ह्यातील तालुक्यांसह पारनेर, श्रीगोंदा कर्जत या नगर व करमाळा या सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांना ही येणार्या कालखंडामध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. अन्यथा पाणी टंचाईचा सामना करावा लागेल, अशी शक्यता वर्तविण्यात येते आहे.
सध्या वाढलेली उन्हाची तीव्रता पाहता येणार्या काळात पाणी संकट येऊ शकते. अशी भीती जलसंपदा विभागाच्या वतीने वर्तविण्यात येत आहे. आंबेगाव तालुक्यात असणारे दरवर्षी पावसाळ्यात १०० टक्के हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण भरते. धरणातील पाणी उजव्या कालव्यातून आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील गावांला जाते.
डाव्या कालव्याच्या माध्यामातून आंबेगाव तालुक्याबरोबरच जुन्नर तालुक्यातील येडगाव धरणात जाते. तेथून नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर कर्जत या तालुक्यांबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यापर्यंत पाणी जाते. त्यामुळे हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणात साठलेल्या पाण्यावर पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांची शेती तसेच अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. परिणामी पिण्याच्या पाण्याचा शेतीचा प्रश्न सोडवण्याच्या डिंभे धरणाच्या माध्यमातून होतो. परंतु यावर्षी डिंभे धरणामध्ये केवळ २६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. येणार्या कालखंडात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील वर्षी यावेळी हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणात ३३.०६ टक्के पाणी साठा होता. मात्र, यावर्षी गत वर्षीच्या तूलनेत कमी पाणीसाठी शिल्लक असल्याने काटकसरीने पाण्याचा वापर करणे गरजेचे आहे. सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होते. तसेच शेती पिकांनाही जास्त पाणी द्यावे लागते. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे.एकंदरीतच पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
प्रशांत कडूसकर, कार्यकारी अभियंता कुकडी प्रकल्प नारायणगाव.
Related
Articles
कन्नड अभिनेते जनार्दन चौहान यांचे निधन
15 Apr 2025
तामिळनाडूतील नवी युती (अग्रलेख)
15 Apr 2025
शुल्कामुळे तुमचाच खिसा रिकामा होणार
14 Apr 2025
मागासवर्गीयांंना काँग्रेसकडून दुय्यम दर्जाची वागणूक
15 Apr 2025
पंजाब संघाकडून प्रियांश आर्यच्या कामगिरीचे कौतूक
11 Apr 2025
सध्या हसण्याच्या अधिकारावरही संकट : डॉ. एस. मुरलधीरन
14 Apr 2025
कन्नड अभिनेते जनार्दन चौहान यांचे निधन
15 Apr 2025
तामिळनाडूतील नवी युती (अग्रलेख)
15 Apr 2025
शुल्कामुळे तुमचाच खिसा रिकामा होणार
14 Apr 2025
मागासवर्गीयांंना काँग्रेसकडून दुय्यम दर्जाची वागणूक
15 Apr 2025
पंजाब संघाकडून प्रियांश आर्यच्या कामगिरीचे कौतूक
11 Apr 2025
सध्या हसण्याच्या अधिकारावरही संकट : डॉ. एस. मुरलधीरन
14 Apr 2025
कन्नड अभिनेते जनार्दन चौहान यांचे निधन
15 Apr 2025
तामिळनाडूतील नवी युती (अग्रलेख)
15 Apr 2025
शुल्कामुळे तुमचाच खिसा रिकामा होणार
14 Apr 2025
मागासवर्गीयांंना काँग्रेसकडून दुय्यम दर्जाची वागणूक
15 Apr 2025
पंजाब संघाकडून प्रियांश आर्यच्या कामगिरीचे कौतूक
11 Apr 2025
सध्या हसण्याच्या अधिकारावरही संकट : डॉ. एस. मुरलधीरन
14 Apr 2025
कन्नड अभिनेते जनार्दन चौहान यांचे निधन
15 Apr 2025
तामिळनाडूतील नवी युती (अग्रलेख)
15 Apr 2025
शुल्कामुळे तुमचाच खिसा रिकामा होणार
14 Apr 2025
मागासवर्गीयांंना काँग्रेसकडून दुय्यम दर्जाची वागणूक
15 Apr 2025
पंजाब संघाकडून प्रियांश आर्यच्या कामगिरीचे कौतूक
11 Apr 2025
सध्या हसण्याच्या अधिकारावरही संकट : डॉ. एस. मुरलधीरन
14 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार